Type Here to Get Search Results !

KARNATAKA BANK मध्ये P.O पदांची भरती : 2024

,

 KARNATAKA BANK मध्ये P.O पदांची भरती : 2024

महत्त्वाची सूचना:  

कर्नाटका बँक (Karnataka Bank)  ही एक प्रतिष्ठित भारतीय वाणिज्य बँक आहे, जी 1924 मध्ये स्थापन झाली. ही बँक कर्नाटका राज्यातील एक प्रमुख बँक आहे आणि संपूर्ण भारतभर तिच्या शाखा आहेत. कर्नाटका बँक खाजगी क्षेत्रातील बँक असून, ती ग्राहकांना विविध वित्तीय सेवा पुरवते. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी पात्रता बगूनच अर्ज सादर करावा व चुकीची माहिती किंवा योग्य पात्रता नसेल तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. www.naukaripahije.com

 



पदांचा तपशील आणि रिक्त जागा:

पदांचे नाव:    रिक्त जागा:
• प्रोबेशनरी ऑफिसर                     -

शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव:  प्रोबेशनरी ऑफिसर
  • शैक्षणिक पात्रता :  (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / कृषी शास्त्रातील पदवीधर / कायद्यातील पदवीधर किंवा सी.ए / सी.एस / सी.एम.ए / आए.सी.डब्लू.ए. 
  • 01/11/2024  नंतर जे उमेदवार  पदव्युत्तर निकालाची प्रतिक्षेत आहेत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत अशा उमेदवारांनी अर्ज भरण्यास पात्र नसतील ही उमेदवारांनी नोंद घ्यावी.      

वयोमर्यादा: 

श्रेणीवयोमर्यादा:
• सामान्य (Open)18 ते 28
• ओबीसी (OBC)18 ते 31
• एससी / एसटी (SC/ST)18 ते 33


परीक्षा फीस: 

  • खुल्या/OBC/उमेदवारांसाठी : ₹800/- + GST 
  • SC/ST/ उमेदवारांसाठी    : ₹700/- + GST 

  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 30/11/2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख :  10/12/2024
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख :10/12/2024
  • परीक्षेची प्राथमिक तारीख :20/12/2024 


परीक्षेचा अभ्यासक्रम

  • कंप्युटर अवेयरनेस
  • इंग्रजी भाषा
  • सामान्य ज्ञान
  • बँकिंग, चालू घडामोडी इत्यादी
  • तर्कशक्ती (Reasoning)
  • संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude)

कंप्युटर अवेयरनेस (Computer Awareness):
यामध्ये संगणकाची मूलभूत माहिती, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरनेट, बॅंकिंग सॉफ्टवेअर 

इंग्रजी भाषा (English Language):
इंग्रजी भाषेतील व्याकरण, शब्दसंग्रह, समज,Tenses, Sentence Structure, संधी शब्द, समीकरण व शब्दसंग्रह, वर्णनात्मक वाक्ये, विरामचिन्हांचा वापर,  शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरोधी शब्द, Spelling,Reading Abilityवाचन आणि लेखन क्षमता या सर्वांचा अभ्यास केला जातो. यात संक्षिप्त नोट्स, निबंध लेखन, व्याकरण संबंधित प्रश्न, आणि वाचनाचे समज (Reading Comprehension) समाविष्ट असू शकतात.

सामान्य ज्ञान (General Awareness):
यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, भारतीय संविधान, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र आणि संस्कृती याबद्दलचे ज्ञान असते. आंतराष्ट्रीय चालू घडामोडी, भारतातील चालू घडामोडी, क्रीडा,ऑलिम्पिक इत्यादी.  

बँकिंग, चालू घडामोडी इत्यादी (Banking, Current Affairs, etc.):
या विभागात बँकिंग प्रणाली, बँकिंग धोरणे, बँकिंग संबंधित कायदे आणि चालू घडामोडी,(जसे की अर्थव्यवस्था, सरकारच्या योजना) चालू क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विश्व घडामोडी, आर्थिक घडामोडी, भारतातील नवीन योजना आणि सरकारी धोरणे,  भारताची आर्थिक स्थिती, जीडीपी, महागाई दर, रोजगार दर, इत्यादी.  

तर्कशक्ती (Reasoning):
यामध्ये अंकगणित, अक्षरे, नाते संबंध , आकृत्या, दिशा, वाचन समज, घड्याळ, दिनदर्शिका, दिशा, वयवारी, तुलना, फासा व ठोकला,घन, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा इत्यादी.  

संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude): वर्ग व वर्गमूळ, शेकडेवारी, वयवारी, नफा तोटा, क्षेत्रफळ, घनफळ, काम काळ वेग, चक्रवाड,Averages, संख्याशास्त्र, अक्षरे व गणित, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, आयत, संख्यात्मक श्रेणी,प्रमाण व्याज इत्यादी. 

  
अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र:


  • 10 वी  (मार्कशीट)  
  • 10 वी (सर्टिफिकेट)
  • १२ वी (मार्कशीट)
  • १२ वी (सर्टिफिकेट)
  • बी.ए ( फास्ट / सेकंड / थर्ड ऑल मार्कशीट)
  • एम.ए (ऑल मार्कशीट)  
  • शाळा सोडल्याचा दाखला (T.C)
  • अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) 
  • जातीचे प्रमाणपत्र (कास्ट) 
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो / सही
  • ई-मेल आयडी 
  • मोबाईल नंबर 
  • अल्टरनेट मोबाईल नंबर 

    फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक
    • NOTIFICATION
    • APPLICATION [अर्ज] APPLY ONLINE
    • WEB SITE [वेबसाईट]http://www.karnatakabank.com/

    Tags,GK

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
    /